राज्यात आजपासून मॅगीवर बंदी

 मॅगीच्या सॅपलमध्ये तफावत आढळल्याने राज्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून उद्यापासून राज्यभरात मॅगीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

Updated: Jun 6, 2015, 08:44 AM IST
राज्यात आजपासून मॅगीवर बंदी  title=

पुणे :  मॅगीच्या सॅपलमध्ये तफावत आढळल्याने राज्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून उद्यापासून राज्यभरात मॅगीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

पुण्यात पत्रकाराशी बोलताना गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. केंद्रानंतर आता राज्यातही मॅगीवर बंदी घालण्यात आली. राज्यातील कोणत्याही विक्रेत्याने मॅगी विकू नये, आपल्याकडे असलेल्या मॅगीची पाकिटे विक्रेत्यांनी परत करावी अशाही सूचना बापट यांनी केल्या आहे. 

देशभरात मॅगीवर संक्रांत आली असताना, महाराष्ट्रात मात्र मॅगीला चक्क क्लिन चीट मिळाली होती.  महाराष्ट्र सरकारच्या प्रयोगशाळांमध्ये मॅगीचे 15 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 9 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात शिसं आढळलंय. 
 
या चाचण्यांमध्ये शिशाचं प्रमाण 0.01 ते 1.40 पीपीएम एवढं आढळलं. 2.5 पीपीएमच्या आत शिशाचं प्रमाण असेल तर ते आरोग्यास अपायकारक नाही, असा खुलासा अन्न व औषध प्रशासनानं केलाय. 
 
मॅगीचे मुंबईतील 4, ठाण्यातील 4 आणि सांगलीतला 1 नमुना चाचणीत पास झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तर पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथून गोळा केलेल्या 6 नमुन्यांचा अहवाल उद्या मिळणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.