नागपूर : नागपूरच्या रणसंग्रामात तरुण उमेदवारांना राजकीय पक्षांकडून पसंती देण्यात आलीय. याशिवाय मध्यमवयीन आणि सत्तरी ओलांडलेले उमेदवारही रिंगणात उतरलेत. मात्र, नागपूर महापालिकेच्या रणांगणात सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे भाजप आणि काँग्रेसमध्ये असल्याचे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालिकेच्या रणसंग्रामात सर्व्हे केलेल्या 837 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रावरुन ही माहिती समोर आली आहे. 75 जणांवर गुन्हे दाखल असून त्यातील 49 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे भाजपचे असून त्यापाठोपाठ काँग्रेसचे उमेदवार आहेत.


विविध पक्षीय उमेदवारांनी निवडणूक आयोगापुढे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपशील दिला आहे. त्यामुळे भाजपने गुंडाना पक्षात घेऊन पवित्र करत असल्याचा विरोधकांच्या आरोपांना अधिक बळकटी मिळत आहे.