कोल्हापूर : राज्यात नाशिक आणि औरंगाबाद सारख्या शहरातील एटीएम खाली असताना कोल्हापुरात मात्र एटीएममध्ये कॅशचा आता कोणताही तुटवडा नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतर जिल्ह्यांप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातल्या एटीएममध्येही गेले काही दिवस खडखडाट होता. मात्र आज सकाळी तरी नागरिकांना ATM मशिनमधून पैसे मिळाले. 


काल दिवसभर नागरिकांनी विविध एटीएमबाहेर पैश्यासाठी रांगा लावूनही त्यांना पैसे मिळाले नव्हते. अचानक उद्भभवलेल्या या चलन तुटवड्यामुळे नागरीक हैराण झाले होते.