ठाणे : ठाण्यात पोलिसांनी 'सत्यम लॉज'वर टाकलेल्या धाडीनंतर धक्कादायक बाब उघड झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपवन परिसरात असलेला 'सत्यम लॉज' अनेकदा वादात होता. या लॉजवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीनंतर या लॉजमध्ये जमिनीखाली तीन अनधिकृत मजले असल्याचं उघड झालं. या तीन अनधिकृत मजल्यांमध्ये तब्बल २९० अनधिकृत खोल्या असल्याचं समोर येतंय. 


या लॉजमध्ये अनैतिक धंदे चालत असल्याचा आरोप होत होता... यानंतर महापालिकेनं कारवाई करत पोलिसांच्या मदतीनं या लॉजवर धाड टाकली. यानंतर हे धक्कादायक सत्य बाहेर आलंय. 


उल्लेखनीय म्हणजे, या जमिनीखालच्या तीन मजल्यांबाबत आणि इथं चालणाऱ्या अनैतिक धंद्यांबाबत आत्तापर्यंत पोलीस आणि महापालिका अंधारातच होती.