इंदापूर गावात दोन घरांवर दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत 5 गंभीर
इंदापूर गावात एकाच रात्रीत 2 घरावर दरोडा पडला असून दरोडेखोरांच्या मारहाणीत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.
इंदापूर : वाशी तालुक्यतील इंदापूर गावात एकाच रात्रीत 2 घरावर दरोडा पडला असून दरोडेखोरांच्या मारहाणीत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये 2 महिलांचा आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. त्यांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे.
इंदापूर गावात रात्री एक वाजण्याच्या सुमारास भर वस्तीत हा दरोडा पडल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 7 ते 8 जणांच्या टोळीने संदीपान गपाट, हनुमंत गपाट यांच्या घरावर हा दरोडा टाकण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरोडेखोरांनी दरवाजे तोडून घरात प्रवेश केला आणि महिलांना मारहाण केली. महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि घरातील लाखो रुपयांची रोख रक्कम लुटून नेली.