मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्हा पुन्हा एकदा शिवसेनेच्या पाठिशी राहिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेने एकहाती यश संपादन केले. तर राष्ट्रवादीने आपले अस्तित्व राखण्यात यश मिळविले आहे. मात्र, भाजपचा सुपडा साफ झाला आहे. एकही जागा जिंकता आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा परिषद एकूण जागा 55 पैकी 39 जागा शिवसेना 15 राष्ट्रवादी आणि 1 काँग्रेस  जागांवर विजयी तर पंचायत समिती एकूण 110 जागा होत्या त्यापैकी जिल्ह्यातमध्ये शिवसेना 73, भाजप 4, एनसीपी 31, मनसे 1 आणि काँग्रेस 1 अशा जागा पदरात पाडल्या.


या विजयानंतर शिवसेनेन एकच जल्लोष केला. ठिकठिकाणी भगवे ध्वज फडकावत फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुका काढल्या. विजयी उमेदवारांनी आपल्या गट आणि गणात मिरवणूका काढून मतदारांचे आभार मानले.


रत्नागिरी जिल्हा परिषद पक्षीय बलाबळ
शिवसेना -  39
राष्ट्रवादी - 15
काँग्रेस -  1
भाजप - 0
एकूण - 55


रत्नागिरी- जिल्हा परिषद गट एकूण 10 जागा
सेना 10 जागांवर विजयी
पंचायत समिती जागा 20 गण
सेना 18 जागांवर विजयी, बीजेपी दोन जागांवर विजयी


लांजा जिल्हा परिषद गट
जिल्हा परिषद जागा ४
सेना 4 जागांवर विजयी
पंचायत समिती जागा ८
सेना 7 जागांवर विजयी, काँग्रेस 1 जागांवर विजयी


मंडणगड जिल्हा परिषद गट दोन
एका जागेवर सेना, आणि एका जागेवर राष्ट्रवादी विजयी
पंचायत समिती एकूण जागा ४
सेना दोन जागांवर विजयी, राष्ट्रवादी दोन जागांवर विजयी


राजापूर जिल्हा परिषद गट- ६
चार जागांवर सेना विजयी, राष्ट्रवादी 1  काँग्रेस 1 जागेवर विजयी
पंचायत समिती जागा १२
9 शिवसेना, राष्ट्रवादी तीन


चिपळूण जिल्हा परिषद गट-९
पाच सेना विजयी, चार राष्ट्रवादी विजयी.
पंचायत समिती जागा १८
शिवसेना 9 जागांवर विजयी, राष्ट्रवादी 9 जागांवर विजयी


गुहागर एकूण जिल्हा परिषद गट जागा ४
सेना एका जागेवर विजयी, एनसीपी 3 जागांवर विजयी
गुहागर पंचायत समिती जागा- ८
बीजेपी एका जागेवर विजयी, सेना 2 जागांवर विजयी, राष्ट्रवादी 5 जागांवर विजयी


खेड जिल्हा परिषद जागा 7 गट
सेना 4 जागांवर विजयी, 3 राष्ट्रवादी काँग्रेस विजयी
पंचायत समिती खेड जागा- 14
सेना आठ जागांवर विजयी, 5 एनसीपी, 1 मनसे


संगमेश्वर जिल्हा परिषद गट-७ 
सेना 7 जागांवर विजयी
पंचायत समिती जागा 14 जागा
13 शिवसेना, 1 भाजप


दापोली जिल्हा परिषद गट- ६
तीन सेना, तीन राष्ट्रवादी
पंचायत समिती जागा १२
पाच शिवसेना आणि सात राष्ट्रवादी




संगमेश्वर तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या सातपैकी सात जागांवर तर पंचायत समितीच्या १४ पैकी १३ जागांवर एकहाती विजय.


जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवार
धामापूर तर्फे संगमेश्वरमधून सहदेव बेटकर, 
कडवईतून संतोष थेराडे, 
कसबा – रचना महाडिक, 
नावडी – माधवी गीते, 
कोसुंब – रोहन बने, 
ओझरेखुर्द – मुग्धा जागुष्टे, 
दाभोळे – रजनी चिंगळे  


पंचायत समितीचे विजयी उमेदवार
धामापूर तर्फे संगमेश्वर – सुभाष नलावडे, 
आरवली – सोनाली निकम, 
कडवई – प्रेरणा कानाल, 
धामणी – संदीप सावंत, 
कसबा – निधी सनगरे, 
फुणगूस – पर्शुराम वेल्ये, 
नावडी – वेदांती पाटणे, 
मुचरी – सुजीत महाडिक, 
कोसुंब – सारिका जाधव, 
ओझरेखुर्द – अजित गवाणकर, 
मोर्डे – शितल करंबेळे, 
कोंडगाव – जयसिंग माने, 
दाभोळे – संजय कांबळे.


निवेखुर्द या केवळ एका पंचायत समिती गणात भाजपाच्या स्मिता बाईत या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत.