जळगाव : जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून उष्माघाताने आतापर्यंत तीन जणांचा बळी गेलाय. यावल तालुक्यातील पाडळसे येथील शेतमजूर राजेंद्र भिरूड हे शेतात काम करून घरी आल्यावर चक्कर आणि उलट्यांचा त्रास झाला यांना तातडीनं खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं नंतर भुसावळ येथ त्यांचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाचा फटका बसल्याने त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी यावेळी सांगितलं. भिरूड यांची परिस्थिती अतंत्य गरिबीची आहे तसंच घरात तेच कर्ते असल्यानं परिवारावर मोठं संकट उभं राहिलंय. दरम्यान उष्माघातामुळं तुकाराम पाटील , तसच भगवान गुरव अस्या तीन जनांचा  उष्माघाताने बळी गेलेत.


उष्माघाताचे तीन बळी



उष्माघातापासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी