सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या लोकांच्या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. नवरा, सासू आणि नणंदेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने आपल्या हातावर लिहून ठेवलं होतं. 

Updated: Jan 24, 2016, 08:30 AM IST
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

नाशिक : सासरच्या लोकांच्या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. नवरा, सासू आणि नणंदेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने आपल्या हातावर लिहून ठेवलं होतं. 

रमेश महाजन यांनी पाच वर्षा पूर्वी आपल्या मुलींचा विवाह नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणाऱ्या विशाल महाजन याच्याशी करुन दिला. 

लग्नातच २ लाख रुपयाच्या हुंड्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अवकाळी पाउस गारपिटीचा सामना करणारा हा गरीब शेतकरी एवढी रक्कम देवू शकला नसल्याने गेल्या पाच वर्षा पासून सातत्याने मुलीचा छळ सुरु होता, त्यातच मुलीच्या सुखासाठी महाजन कुटुंबियांनी गाडी विकून घरदार विकण्याचीही तयरी दाखविली होती मात्र सासरच्या लोकांची पैशांची हवं काही सुटत नव्हती. 

पूनमला पहिल्या मुलीनंतर सात महिन्यापूर्वी दुसरी मुलगीच झाली आणि तिच्या त्रासात वाढ झाली. आणि अखेर शुक्रवारी दुपारी तिने आपली जीवनयात्रा संपविली.

आत्महत्येपूर्वी आपल्या डाव्या हातावर सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने लिहून ठेवलय. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय...

पूनमच्या माहेरच्यांच्या फिर्यादी नुसार उपनगर पोलिसांनी तिचा नवऱ्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता, न्यायालायानं तीन दिवसांची पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली असून यातील इतर संशयित सासू, सासरे, नणंद यांच्यावर अद्यापही पोलिसांची मेहरनजर असल्याचं दिसतय. त्यांनाही तत्काळ अटक करून कठोर शिक्षेची मागणी केली जातेय.