मुंबई : महापालिकेच्या सर्व अभियंत्यांनी मनसे नगरसेवकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. पालिकेच्या सर्वच्या सर्व 4200 अभियंत्यांनी उद्यापासून कामबंदची हाक दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोपर्यंत मनसे गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरी यांच्यावर कारवाई करत नाहीत तोपर्यंत कामावर न येण्याचा निर्धार अभियंत्यांनी केलाय. 


तत्पूर्वी सर्व अभियंत्यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे राजीनामे सोपवले. मात्र कारवाई करण्याचे आश्वासन देऊन मेहतांनी सर्वांचे राजीनामे फेटाळून युनियनकडे परत पाठवले. मात्र तरीही अभियंत्यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवत मनसे नगरसेवकांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. 


अभियंत्यांच्या या आंदोलनाला मुंबई महापालिकेच्या इतर सर्व सव्वा लाख कामगारांनीही पाठिंबा दिलाय. कामबंद आंदोलन असलं तरी सर्व अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत.