आम आदमी पक्षाचे नेते मयांक गांधींवर गुन्हा

आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांच्यासह एकूण सहा कार्यकर्त्यांविरोधात ओशिवरा पोलिसांनी विनयभंग आणि धमकीचा गुन्हा नोंदविला. त्यात एका महिलेचाही सहभाग आहे. पोलीस प्रवक्ते उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी या वृत्तास दुजोरा दिला. 

PTI | Updated: Sep 21, 2014, 01:49 PM IST
आम आदमी पक्षाचे नेते मयांक गांधींवर गुन्हा title=

मुंबई: आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांच्यासह एकूण सहा कार्यकर्त्यांविरोधात ओशिवरा पोलिसांनी विनयभंग आणि धमकीचा गुन्हा नोंदविला. त्यात एका महिलेचाही सहभाग आहे. पोलीस प्रवक्ते उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी या वृत्तास दुजोरा दिला. 

पेशानं शिक्षक असलेल्या २१ वर्षीय तरुणीनं विनयभंग, धमकीची तक्रार दिली होती. तरुण सिंग, सॅम, कविता अशी अन्य आरोपींची नावं आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.  

लोकसभा निवडणुकीदरम्यान तरुण सिंग नामक कार्यकर्त्यानं आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. त्यावेळी या संबंधित महिलेनं पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रार न करण्यासाठी मयांक गांधींकडून धमकी मिळाल्याचं या महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.