अॅट्रासिटी रद्दच्या मागणीवर प्रकाश आंबेडकर म्हणाले...
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, असं राज ठाकरेंना वाटत असेल, तर त्यांनी मागणी करण्यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करावं.
मुंबई : अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, असं राज ठाकरेंना वाटत असेल, तर त्यांनी मागणी करण्यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करावं, लोक त्यांच्या मागे आहेत किंवा नाही हे त्यांना दिसून येईल, असं भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा असं पुण्यात एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, यावर प्रकाश आंबेडकर एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे, हा कायदा रद्द करण्यात यावा, अॅट्रॉसिटीच्या गैरवापर होतोय किंवा नाही याचा अभ्यास करून, नवीन कायदा अस्तित्वात आणावा असं म्हटलं आहे.