मुंबई : पाकिस्तानी कलाकारांना समर्थन देणाऱ्या बॉलीवूड अभिनेता सलमान खानला शिवसेना खासदार सुभाष देसाईंनी चांगलाच टोमणा मारलाय.
सलमानला एका कार्यक्रमात पाकिस्तानी कलाकारांवरीर बंदीबाबत विचारण्यात आले होते. यावर मत व्यक्त करताना सलमान म्हणाला,
सलमानने एका कार्यक्रमात पाकिस्तानी कलाकार दहशतवादी नाहीत असे विधान केले होते. पाकिस्तानी कलाकार दहशतवादी नाहीत. ते कलाकार आहेत आणि त्यांना आपले सरकारच येथे येण्यासाठी व्हिसा देते, असे विधान केले होते.
यावर देसाईंनी सलमानला सल्ला दिलाय. अशी कोणतीही विधाने कऱण्याआधी सलमानने त्याच्या वडिलांशी चर्चा करावी, असे त्यांनी म्हटलेय.