दीपक भातुसे, मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी निलंबित ठेवला आहे.
याबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी सरकारने महापालिकेला तीस दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर सरकार हा ठराव स्वीकारायचा की फेटाळायचा याचा निर्णय घेणार आहे.
दरम्यान प्रस्ताव स्वीकरण्याचा अथवा फेटाळण्याचा निर्णय न घेता तो निलंबित करून हा विषय भिजत ठेवण्याची खेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्ष शिवसेनेला शह देण्यासाठी खेळली आहे.
भाजपा वगळता हे तीनही पक्ष भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे आणि प्रामाणिक अधिका-याच्या विरोधात असल्याचे चित्र राज्यभर आहे. त्याचाच आगामी नगरपालिका निवडणुकीत या पक्षांविरोधात वापर करण्याची ही भाजपा आणि मुख्यमंत्र्यांची राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे.