सहकारी महिलेचा लैंगिक छळ, मुंबई सत्र न्यायाधीश निलंबित

महिला सहकारी कर्मचा-याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या एका न्यायाधीशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

Updated: Aug 20, 2014, 07:40 PM IST
सहकारी महिलेचा लैंगिक छळ, मुंबई सत्र न्यायाधीश निलंबित title=

मुंबई : महिला सहकारी कर्मचा-याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या एका न्यायाधीशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

एम.पी.गायकवाड असं निलंबित न्यायाधीशांचं नाव असून त्यांची अंमली पदार्थ प्रतिबंध क़ायदा न्यायालायातील न्यायाधीश म्हणून नियुक्ति करण्या़त आली होती. न्यायाधीशांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयातून देण्यात आली आहे.

संबंधीत महिला कर्मचा-याने लैंगिक छळ झाल्याची तक्रार वरीष्ठ न्यायाधिशांकडे केली होती. त्यानंतर प्राथमिक चौकशीत महिलेनं दिलेल्या तक्रारीत तथ्य असून, लवकरच एका वरीष्ठ न्यायाधीशांच्या समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करून संबंधीत प्रकरण निकाली लावलं जाईल, असे मुंबई उच्च न्यायालायातकडून सांगण्यात आलं आहे. जर तक्रारीत सत्यता आढळून आलं तर स्थानिक पोलीसांकडे प्रकरण वर्ग केलं जाईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.