मुंबईत चार मजली इमारत कोसळली, ५० जण अडकल्याची भीती

मुंबईतील डॉकयार्ड रोड स्टेशनजवळ आज सकाळी ५.४५ वाजता चार मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६०जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या असून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 27, 2013, 03:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील डॉकयार्ड रोड स्टेशनजवळ आज सकाळी ५.४५ वाजता चार मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६०जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या असून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
ही इमारत बीएमसी कॉलनी परिसरातील असून ती जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत रात्रीपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे ही जुनी इमारत कोसळल्याचे म्हटले जात आहे. इमारत विचित्र पद्धतीने कोसळली. या इमारतीत जवळपास १२० च्यावर लोक राहत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली ७० ते ८० जण दबल्याची भीती व्यक्त होत आहे.
इमारत कोसळ्याची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. इमारत ज्या ठिकाणी कोसळली त्या ठिकाणी विचित्र परिस्थिती आहे. मदत कार्यात अडथळा येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ