मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांवर निवडणूक निकालाचे सावट
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांवर मुंबई महापालिका निकालाचे सावट जाणवून येत आहे. महापालिकेत सत्ता कशी स्थापन करायची याची शिवसेनेत चिंता आहे. तर अपयशामुळे मनसेत यंदा मराठी भाषा दिन साजरा करण्यात तितकासा उत्साह नाही. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार संघटनेनं प्रथेप्रमाणे आज सायंकाळी रंगशारदा सभागृहात `गर्जते आई मराठी` या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
मुंबई : मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांवर मुंबई महापालिका निकालाचे सावट जाणवून येत आहे. महापालिकेत सत्ता कशी स्थापन करायची याची शिवसेनेत चिंता आहे. तर अपयशामुळे मनसेत यंदा मराठी भाषा दिन साजरा करण्यात तितकासा उत्साह नाही. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार संघटनेनं प्रथेप्रमाणे आज सायंकाळी रंगशारदा सभागृहात 'गर्जते आई मराठी' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरे मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मार्गदर्शनपर भाषणही करणार आहेत. मुंबईत मराठी भाषिकांचा घसरलेला टक्का आणि मतविभागणी , त्याचा शिवसनेनेला बसलेला फटका आणि भाजपला अनुकूल अन्य भाषिक मतदारांची वाढलेली संख्या हे मुद्दे उद्धव आपल्या भाषणात मांडू शकतात. तर यंदा मनसेनं कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही. स्थानिक स्तरावरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष तयारी केलेली आढळत नाही आहे.