मुंबई : महाराष्ट्र आणि हरियाणात एकसाथ आणि एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १५ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मात्र, याआधीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला विभागवार किती जागा मिळाल्या होत्या. याचा एक रिपोर्ट.
विधानसभेचे 288 आमदार निवडून आणण्यासाठी तब्बल ८ कोटी २५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राजकीय पक्षांना प्रचारासाठी केवळ २४ दिवसच मिळणार असल्यानं नेत्यांची चांगलीच धावपळ होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 'नोटा'चा (नकाधिकार) वापर केला जाणार आहे. तसंच मतदारांना घरपोच वोटिंग आयडी स्लीप पुरवली जाणार आहे.
2009च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या त्यावर एक नजर. 288 पैकी शिवसेनेला 44 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 46 जागेंवर विजय मिळाला होता तर काँग्रेसला 82 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 62 जागा मिळाल्या होत्या.
प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मनसेने 13 जागा पटकावल्या होत्या. अपक्षांनी 24 तर इतरांनी 17 जागा मिळाल्या होत्या. आता आपण पाहाणार आहोत 2009च्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांनी विभागवार जिंकलेल्या जागा.
कोकण विभागात एकूण 15 जागा
शिवसेनेला 4 , भाजप 1, काँग्रेस 2,राष्ट्रवादी 5, अपक्ष 0 , मनसे 0, इतर 3
मुंबई विभागातील एकूण 36 जागा
शिवसेनेला 4, भाजप 5, काँग्रेस 17,राष्ट्रवादी 3, अपक्ष 0 , मनसे 6 , इतर 1
ठाणे विभागात एकूण 24 जागा
शिवसेनेला 5, भाजप 4, काँग्रेस 1,राष्ट्रवादी 5,मनसे 2, अपक्ष 2 , इतर 5
उत्तर महाराष्ट्र विभागात एकूण 35 जागा
शिवसेनेला 7, भाजप 4, काँग्रेस 6,राष्ट्रवादी 9, मनसे 3, अपक्ष 3 , इतर 3
विदर्भ विभागात 62 जागा
शिवसेनेला 8, भाजप 19, काँग्रेस 24,राष्ट्रवादी 04,मनसे 0, अपक्ष 6 , इतर 1
मराठवाडा विभागातील एकूण 46 जागा
शिवसेनेला 7, भाजप 2, काँग्रेस 18,राष्ट्रवादी 12, मनसे 1, अपक्ष 5 , अन्य 1
पश्चिम महाराष्ट्र विभागात 70 जागा
शिवसेनेला 9, भाजप 11, काँग्रेस 14, राष्ट्रवादी 24, मनसे 1, अपक्ष 8 , इतर 3
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.