मुंबई : उष्ण तापमानाचा आंबा उत्पादनालाही फटका बसणार आहे. जास्त तापमानामुळे आंब्याच्या बागा लवकर परिपक्व होत असल्याने या वर्षी आंब्याचा हंगाम लवकर संपणार असल्याचं आंबा विक्रेते सांगतायत. तर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिनाडू आणि कर्नाटक अशा राज्यामध्ये यावर्षी अब्याचा हंगाम लवकर संपणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जास्त तापमान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम झालाय. तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे आंब्याला उठाव नाही. अशा बिकट परिस्थिती आंबा विक्रेत्यांना नुकसान सहन करून व्यापार करावा लागतोय. यावर्षी आंब्याचा हंगाम लवकर संपणार असल्यानं दरही चढे राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत.


धुळ्यासारख्या शहरात दरवर्षी ८ ते १० ट्रक आंबा  बाजारात येत होता. यावर्षी मात्र फक्त ४ ते ५ ट्रक आंबा येत असून त्याची विक्रीही मंदावली आहे.