लालबागचा राजा मंडळ आता नव्या वादात

लालबागचा राजा मंडळ आता नव्या वादात अडकलं आहे. लालबागमधले रहिवासी, मंडळाचे माजी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी मंडळाबाबत राज्यपालांकडे तक्रार केली आहे.

Updated: Sep 7, 2016, 06:12 PM IST
लालबागचा राजा मंडळ आता नव्या वादात

मुंबई : लालबागचा राजा मंडळ आता नव्या वादात अडकलं आहे. लालबागमधले रहिवासी, मंडळाचे माजी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी मंडळाबाबत राज्यपालांकडे तक्रार केली आहे. याची दखल घेत राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी विधी आणि न्याय विभाग तसंच नगरविकास विभागाला यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत.

वेंगुर्लेकरांनी मंडपातल्या सुरक्षेपासून ते आर्थिक उलाढालीपर्यंत अनेक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत. पूर्वी घडलेल्या चोरी, मुलाचा मृत्यू अशा घटनांबाबतही वेंगुर्लेकरांनी गंभीर आरोप केले आहेत.