LBT संपाविरोधात व्यापाऱ्यांना मनसेचा इशारा...

एलबीटीचा मुद्दा आता जास्तच चिघळत चालला आहे. आणि त्यावर मनसेनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याआधीही व्यापाऱ्यांना इशारा दिला होता.

Updated: May 9, 2013, 01:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एलबीटीचा मुद्दा आता जास्तच चिघळत चालला आहे. आणि त्यावर मनसेनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याआधीही व्यापाऱ्यांना इशारा दिला होता. मात्र व्यापाऱ्यांनी राज ठाकरेंचा आदेश धुडकावून लावला. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.? राज ठाकरेंनी याआधीच स्पष्ट केलं आहे. की, सामान्य जनतेला वेठीस धरू नका.
तुम्ही विरोध नक्की करा. मात्र त्यासाठी सामान्यांना वेठीस धरू नका. असेही आवाहन व्यापाऱ्यांना केले होते. त्यांच्या समस्येविषयी मनसेचं काहीही दुमत नाही. मात्र त्यासाठी जनतेचे हाल होऊ नयेत याचीही काळजी व्यापाऱ्यांनी घेतली पाहिजे. आज जीवनाश्यक वस्तू मिळत नाहीये. त्यामुळे संतप्त झाले आहेत. त्यामुळे लोकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे लोकांचा उद्रेक होण्याआधी यांनी व्यापांऱ्यांनी लोकांना वेठीस धरणं बंद करावं.
राज ठाकरेंनी याआधीही इशारा दिला आहे. त्यामुळे आता लोकभावना लक्षात घेतली पाहिजे. आणि जर व्यापाऱ्यांनी तरीही ऐकलं नाही तर मात्र राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील. किंबहुना पक्ष यापुढे जे काही करायचं ते करतील. त्यांच्या प्रश्नासंबंधी राज ठाकरे स्वत: पुढाकार घेतील. मात्र त्यांनी आधी जनतेला होणारा त्रास थांबला पाहिजे. नाहीतर यापुढे जनताही रस्त्यावर उतरेल. ‘झी २४ तास’शी बोलताना मनसे आमदार प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.