मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेमध्ये नवा वाद उफाळून आलाय. आज महापालिकेच्या सभागृहात प्रबोधनकार ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण होतंय. पण शिवसेनेनं मनसेची संकल्पना चोरल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली 15 वर्ष सत्तेत असताना शिवसेनेला प्रबोधकारांची आठवण झाली नाही काय़ असा सवाल चेतन कदम यांनी विचारलाय. प्रबोधनकारांचा अर्धपुतळा महापालिकेच्या सभागृहात बसवावा असा प्रस्ताव कदम यांनी मांडला होता. पण त्यावेळी अपुऱ्या जागेचं कारण देऊन पुतळा शक्य नसल्याचं कदमांना कळवण्यात आलं होतं. 


त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांच्या माध्यमातून शिवसेनेनं तैलचित्राचा प्रस्ताव मांडून तो मंजूर करून घेतला. आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या तैलचित्राचं अनावरण होणार आहे. त्यामुळे शिवसेनेनं आपली संकल्पनाच चोरल्याचा आरोप मनसे चेतन कदम यांनी केलाय.