मुंबई : राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या सभेत सांगितलं, गुगलवर फेकू लिहून पाहा, काय दिसतं तुम्हाला? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच राज ठाकरे म्हणाले, तुमच्या जवळ मोबाईल आहेच, आताच जागेवर मोबाईलमध्ये गुगलवर फेकू लिहा, पाहा तुम्हाला कुणाचं नाव दिसंत, तुम्ही गुगलवर फेकू सर्च केलं तर तुम्हाला मोदींचं नाव दिसेल.


 पाहा काय प्रतिमा आहे, आपल्या पंतप्रधानांची जगभरात? असा सवाल राज ठाकरे यांनी केल्यावर, खालून कार्यकर्त्यांकडून आवाज आला फेकू. यानंतर अनेक कार्यकर्ते आपल्या मोबाईलमध्ये गुगलवर फेकू सर्च करताना दिसले.


यापूर्वी राज ठाकरे यांनी सांगितलं की भाजपा या शब्दाला नवीन पर्यायी शब्द आहे, 'थापा' यावर कार्यकर्त्यांमध्ये एकच हाशा पिकला.