मुंबई: मंत्री पदाचा राजीनामा देउन एक आठवडा उलटला तरी काँग्रेसनं नारायण राणे यांच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत राणे यांनी मागच्या सोमवारी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची काँग्रेसच्या वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चाही झाली. राज्यात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांबरोबरची चर्चा समाधानकारक न झाल्यानं राणेंनी दिल्लीत जावून राहुल गांधींची भेट घेतली. राहुल गांधी यासंदर्भात सोनिया गांधींशी चर्चा करणार आहेत.
सोनिया गांधींच्या भूमिकेवर राणे यांच्या राजीनाम्याचं भवितव्य अबलंबून असेल. राणे यांनी आक्रमक भूमिका घेवूनही काँग्रेसने त्यांच्या बाबत ठोस निर्णय न घेतल्यानं राणे समर्थक संभ्रमात आहेत. आता राणे पुढे काय पाऊल टाकतात त्याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.