मुंबई : कार्यालयीन  कामकाजा वेळी एखादा सरकारी बाबू मोबाईलमध्ये कॅन्डी क्रश खेळताना  किंवा एकमेकांसोबत गप्पा मारताना फार फार तर झोपा काढताना अनेकदा आपण पाहिलं असेल. परंतु सरकारी कार्यालयात अक्खा साडीचा स्टॉल मांडलेला कधी पाहिलाय का ?  मुलुंड मधील शिधावाटप कार्यालयात अस घडलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या कामासाठी राजेंद्र पाटील या शिधा वाटप लाभार्थी मुलुंड  केंद्रात आला असता,  कार्यालयीन कामकाजाच्या वेळात महिला कर्मचारी चक्क साडी विक्रेत्याला कार्यलतात बोलावून साड्या खरेदी करत असल्याचं आढळून आलं. 


सुमारे अर्धा ते पाऊण तास हा प्रकार सुरु होता शेवटी त्यांनी हा प्रकार मोबाईल मध्ये शूट केला. यासंदर्भात इथले शिधावाटप अधिकारी टी. के. पवार यांना संपर्क केला असता, यातील सत्यता पडताळून दोषींवर कार्यवाही करणार असल्याचं त्यांनी सांगितले. परंतु या प्रकारामुळे मुलुंडच शिधावाटप कार्यालय आहे की साड्यांचे दुकान, अशी चर्चा मुलुंडमध्ये रंगली होती.