जिंकून येणारा उमेदवार दिल्याने हेगडेंनी पक्ष सोडला - निरुपम
कृष्णा हेगडे यांच्या वॉर्डात प्रिया दत्त यांनी सुचवलेला जिंकून येणारा उमेदवार दिल्यामुळे नाराज होऊन हेगडेंनी पक्ष सोडल्याचा दावा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.
मुंबई : कृष्णा हेगडे यांच्या वॉर्डात प्रिया दत्त यांनी सुचवलेला जिंकून येणारा उमेदवार दिल्यामुळे नाराज होऊन हेगडेंनी पक्ष सोडल्याचा दावा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.
मुंबई काँग्रेस समिती स्थापन करताना हेगडेंना पदाधिकारी बनवण्याबाबत फोन केला होता. मात्र त्यांनी चार वर्षं व्यवसाय करणार आणि नंतर पुन्हा राजकारण असं सांगितल्याचंही निरुपम यांचं म्हणणं आहे. मुंबई काँग्रेसमध्ये गेल्या दोन वर्षांपासून आपण पक्षात लोकशाही आणल्याचं निरुपम म्हणाले.