मुंबई : मुंबई महापालिकेत सत्तेचं गणित जुळवण्यासाठी शिवसेना नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला होता, असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केलाय. मात्र, काँग्रेस शिवसेनेला अजिबात पाठिंबा देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेनेचे अनेक नेते आमच्या नेत्यांच्या संपर्कात... पण आम्ही सेनेसोबत जाणार नाही, ही काँग्रेसची भूमिका अंतिम आहे, अशा स्पष्ट शब्दांत निरुपम यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. महापौर पदासाठी सेनेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काँग्रेस मदत करणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. यामुळे, मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या अडचणी वाढल्यात.


काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीनंतर निरूपम बोलत होते. शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी काँग्रेसनं मदत करू नये, अशी भूमिका गुरूदास कामत यांनीही राहुल गांधींना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केली होती.