मुंबई पालिकेच्या खड्ड्यानं घेतला दोघांचा जीव
मुंबई पालिकेच्या खड्ड्यानं दोघांचा जीव घेतला. मानखुर्द परिसरातील एका खड्ड्या बुडून दोघांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी पालिकेच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हायड्रोलिक डिपार्टमेंटनं पंधरा दिवसांपूर्वी हा खड्डा खोदला.
मुंबई : मुंबई पालिकेच्या खड्ड्यानं दोघांचा जीव घेतला. मानखुर्द परिसरातील एका खड्ड्या बुडून दोघांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी पालिकेच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हायड्रोलिक डिपार्टमेंटनं पंधरा दिवसांपूर्वी हा खड्डा खोदला.
रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमाराला इकरार या खड्ड्यात पाय घसरून पडला आणि त्याला वाचवण्यासाठी त्या खड्ड्यात उडी घेतलेल्या जलालुद्दीनचाही यात बळी गेला. या दोघांचा मृत्यू बुडल्यामुळे झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणय, तर या पाण्यात वीजेचा धक्का लागल्यानं मृत्यू झाल्याचं परिसरातल्या काही रहिवाशांचं म्हणणंय.
या खड्ड्याला फक्त रस्त्याच्या कडेनं घेरण्यात आलं होतं. घटनेनंतर तब्बल अडीच तीन तासांनंतर या दोघांनाही अग्निशमन आणि पोलिसांच्या मदतीनं बाहेर काढलं. राजावाडी हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं मात्र तोवर दोघांचा मृत्यू झाला होता. दुर्घटना घडून 24 तास उलटून गेलेयत मात्र अजुनही ठेकेदाराला अटक करण्यात आलेली नाही.