अजित मांढरे, मुंबई : मुंबईची नवी पोलीस आयुक्तालय इमारत सहा मजल्यांची आहे.
या इमारतीत तळमजल्यावर सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना, पोलीस फिटनेस सेंटर आणि भव्य कॅन्टीन आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर मुंबई पोलीस प्रशासकिय विभागाचं कामकाज चालणार आहे. तिस-या अणि चौथा मजल्यावर मुंबई क्राईम ब्रांचला अद्यावत असं कार्यालय देण्यात आलंय. तर सहाव्या मजल्यावर सर्व यंत्रणांनी सुसज्ज असे दोन मोठे कॉन्फरन्स हॉल बनवण्यात आलेत.
या नवीन इमारतीत सर्वात महत्वाचा विभाग आहे पाचव्या मजल्यावरचा सोशल मिडीया विंग, कंट्रोल रुम आणि सीसीटीव्ही कंट्रोल रुम... कशी आहे ही कॅट्रोल रुम त्याबाबत जाणून घेऊयात या व्हिडिओतून...