www.24taas.com, दीपक भातुसे, मुंबई
सरकारमध्ये असून काम होत नाहीत आणि त्यामुळे आम्ही टार्गेट होतो, म्हणून आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
सरकारला आपण बाहेरून पाठिंबा देऊ, असंही अजित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक सुरू आहे, यात अजित पवार यांनी आपलं आक्रमक मत मांडलं आहे.
अजित पवारांनी सरकारमधून बाहेर पडून, सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ असा इशारा दिला असला. तरी निवडणुकांचं घोडामैदान तोंडावर आल्याने हा इशारा सध्या तरी फुसका ठरला आहे.
लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून १४ उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र यातही काही ठिकाणी बदल होण्याची शक्यता नाकारण्यात येत नसल्याचंही म्हटलं जात आहे.
यावेळी ही काँग्रेस राष्ट्रवादीचा फॉर्म्यूला मागील निवडणुकीसारखाचं असेल की त्यात बदल होईल, अथवा काही जागांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आप आपसात बदल करून घेतील का? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.