www.24taas.com, मुंबई
काँग्रेस सरचिटणीस राहूल गांधी २ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते थोड्या वेळापूर्वीच मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे खुद्द विमानतळावर दाखल झाले होते. राहुल गांधी आज मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार असून युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
तर उद्या राहुल गांधी साताऱ्यातल्या दुष्काळी भागात जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी करणार आहेत. नुकताच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकीत काँग्रेसला हवं तसं यश मिळालं नाही.
महाराष्ट्रातल्या मनपा निवडणूकीतही काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. या पार्श्वभूमीवर राहूल गांधींचा हा महाराष्ट्र दौरा महत्वाचा मानला जातोय. उद्या राहूल गांधी दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्यानं दुष्काळग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळण्याची शक्यताही व्यक्त होते आहे.