www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील आलेसुर गावात शेळ्यांवर ताव मारण्यासाठी आलेल्या एका पूर्ण वाढीच्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झालाय. वनविभागाच्या पथकाकडे बचाव कार्यासाठी अपुरी साधनं असल्यानं हा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय.
विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी बेशुद्धीचे इंजेक्शन मारण्यात आलं. मात्र बेशुध्द बिबट्याला बाहेर काढलं जात असताना वहिरित सोडलेली खाट अनियंत्रित झाली अणि बिबट्या विहिरीत कोसळला तो वर आलाच नाही. अखेर तब्बल ३ तासांनी बिबट्याचे शव बाहेर काढण्यात आले.
बेवारस कुत्री आणि शेळ्या या आपल्या आवडत्या खाद्यासाठी निवासी भागात आलेल्या एका बिबट्याने घरात ठाण मांडल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात सोमवारी सकाळी एकच खळबळ उडाली. बल्लारपूर शहरातील संतोषी माता वॉर्डातील पटेल यांच्या घरात एका खोलीत हा बिबट्या शिरला. सकाळी लक्षात आलेल्या या प्रकाराने हजारो बघ्यांची गर्दी परिसरात जमा झाली. पोलीस आणि वन विभागाचं पथकही या भागात दाखल झाले.
बघता बघता बिबट्याला काबूत आणण्याच्या प्रयत्नांना जोर चढला. बिबट्या लपून बसलेल्या खोलीच्या वरच्या भागातील कौवलं काढून बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्याचे ३ प्रयत्न झाले. मात्र त्यात यश आले नाही. या प्रयत्नांनी बिबट्या मात्र चांगलाच चिडला. त्याने कवलांमधून भरारी घेत बचाव पथकातील चौघांना जखमी करून पुन्हा खोलीत आश्रय घेतला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.