www.24taas.com , झी मीडिया, यवतमाळ
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज विदर्भ दौऱ्यावर येतायत. त्यामुळं या दौऱ्यात त्यांच्या भेटीची आस यवतमाळमधील शेतकऱ्याची विधवा कलावती हिला लागलीय. नागपूर दौऱ्यात काँग्रेसच्या युवराजांना भेटण्याची इच्छा तिनं व्यक्त केलीय.
त्यांना भेटून शेतकऱ्यांच्या विधवांच्या समस्या सांगणार असल्याचं तिनं सांगितलंय. राहुल गांधी हे भावाप्रमाणं असून त्यांच्या भेटीनंतर जीवन पालटल्याची भावना कलावतीनं व्यक्त केलीय. त्यामुळं त्यांना भेटून आपल्या सात मुलींची लग्नं आणि मुलांच्या शिक्षणाची माहिती देणार असल्याचं तिनं म्हटलंय.
२००५ साली परशुराम बांदुरकर या शेतकऱ्यानं कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर २००८ साली राहुल गांधी यांनी विदर्भ दौऱ्यात यवतमाळच्या जळका गावात राहणाऱ्या कलावतीची भेट घेतली. कलावतीच्या कुडाच्या घरात बसून चर्चा केल्यानंतर त्यांनी तिच्या हलाखीची परिस्थितीबाबतची माहिती संसदेला दिली. त्यामुळं कलावतीकडे साऱ्या देशाचं लक्ष वेधलं गेलं. तिच्याकडे मदतीचा ओघ सुरु झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ