मुंबई : बीसीसीआयनं यंदाच्या सिझनमध्ये भारतात होणाऱ्या मॅचचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. सप्टेंबरमध्ये न्यूझिलंड विरुद्धच्या सीरिजपासून भारताचा घरच्या मैदानातला सिझन सुरु होईल. या सिझनमध्ये भारत घरच्या मैदानात तब्बल 13 टेस्ट, 8 वनडे आणि 3 टी 20 अशा एकूण 24 मॅच खेळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे, राजकोट, विशाखापट्टणम, धर्मशाला, रांची आणि इंदौर या स्टेडियमवर पहिल्यांदाच टेस्ट मॅच होणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये पुण्यात इंग्लंड विरुद्धची एक वनडे आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धची एक टेस्ट अशा दोन मॅच होणार आहेत. तर मुंबईला मात्र इंग्लंडविरुद्धची एकमेव टेस्ट मिळाली आहे. 


असं असेल टीम इंडियाचं वेळापत्रक


न्यूझिलंड विरुद्ध 3 टेस्ट- इंदौर, कानपूर, कोलकाता


न्यूझिलंड विरुद्ध 5 वनडे- धर्मशाला, दिल्ली, मोहाली, रांची, विशाखापट्टणम


इंग्लंड विरुद्ध 5 टेस्ट- मोहाली, राजकोट, मुंबई, विशाखापट्टणम, चेन्नई


इंग्लंड विरुद्ध 3 वनडे- पुणे, कटक, कोलकाता


इंग्लंड विरुद्ध 3 टी 20- बैंगलोर, नागपूर, कानपूर


ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 टेस्ट- बैंगलोर, धर्मशाला, रांची, पुणे


बांग्लादेश विरुद्ध 1 टेस्ट- हैदराबाद