टीम इंडियाला श्रीलंकेने धूळ चारली

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात व्हॉइटवॉश दिल्यानंतर भारत श्रीलंकेविरूध्द नांग्या टाकल्या. श्रीलंकेने भारताला ५ गडी राखून धूळ चारली. 

Updated: Feb 10, 2016, 09:36 AM IST

पुणे :  ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात व्हॉइटवॉश दिल्यानंतर टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलेल्या भारताची विजयाची नशा श्रीलंकेने उतरवली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवत पाहुण्या श्रीलंकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतलीये. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारताची कामगिरी सुमार झाली. अवघ्या शंभर धावांचा टप्पा गाठताना भारतीय फलंदाजांची पुरेपूर दमछाक झाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना १०१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेच्या संघाने पाच गडी राखून हे आव्हान पूर्ण केले आणि विजयाची बोहनी केली.