नवी दिल्ली : टी-२० वर्ल्डकपची सेमीफायनल आता पूर्वी ठरलेल्या वेळापत्रकानुसार ३० मार्चला फिरोजशाह कोटला मैदानावर होणार आहे. सेमीफायनल कोठे होणार, याचीच चर्चा अनेक दिवस सुरु होती. आता याला पूर्णविराम मिळालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघा (डीडीसीए)च्या स्टेडिअमवर वादग्रस्त आप पी मेहरा ब्लॉकचा उपयोग करण्याची मंजुरी मिळाली आहे. या ब्लॉकला स्वीकृती प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे येथे मॅच खेळवू नका अशी मागणी होती. त्यामुळे सेमीफायनल कोठे होणार याची साशंकता होती. मात्र, डीडीसीएला मंजुरी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय कालच्या बैठकीत ठरले.


उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यवेक्षक नियुक्त केलेले निवृत्त न्यायमूर्ती मुकुल मुदगल यांच्यासोबत अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ही मंजुरी २०१७ पर्यंत देण्यात आली आहे. केवळ हा एकच सामना नाही तर आयपीएलच्या सर्व मॅच नियोजित कार्यक्रमानुसार होणार आहेत.