रॅपर हनी सिंगची कबड्डी टीम... ‘यो यो टायगर्स’

अभिनेता अक्षय कुमार नंतर आंतरराष्ट्रीय कबड्डी लीगमध्ये टीम खरेदी करणारा सेलिब्रिटी ठरलाय.... स्टार रॅपर यो यो हनी सिंग.... या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान विविध देशांत कबड्डी लीगचं आयोजन केलं जाणार आहे.

Updated: Jul 12, 2014, 12:45 PM IST
रॅपर हनी सिंगची कबड्डी टीम... ‘यो यो टायगर्स’ title=

नवी दिल्ली : अभिनेता अक्षय कुमार नंतर आंतरराष्ट्रीय कबड्डी लीगमध्ये टीम खरेदी करणारा सेलिब्रिटी ठरलाय.... स्टार रॅपर यो यो हनी सिंग.... या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान विविध देशांत कबड्डी लीगचं आयोजन केलं जाणार आहे.

हनी सिंगनं नुकतीच दुबईत ग्लोबल फायटिंग चॅम्पियनशिपही सुरू केलीय. ‘मला अॅक्शन असणारे खेळ खूप आवडतात... आणि कबड्डी माझा सगळ्यात आवडता खेळ आहे. मी ज्या खेळावर विश्वास ठेवतो अशाच खेळाशी मी जोडला गेलोय... आणि म्हणूनच मी आंतरराष्ट्रीय कबड्डी लीगमध्ये एक टीम खरेदी केलीय आणि टोरंटो माझ्या टीमचं यजमान म्हणून स्वागत करेल’ असं नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत हनी सिंगनं म्हटलंय. 

‘मी गेल्या दीड महिन्यांपासून याच पाठिमागे होतो... मी या टीमला ‘यो यो टायगर्स’ असं नाव दिलंय... या टीमला स्क्रिनवर पाहण्यासाठी मी उत्सुक आहे... या मॅचचं कव्हरेज सोनी सिक्सवर दाखवण्यात येणार आहे’ अशीही माहिती त्यानं यावेळी दिलीय. 

बॉलिवूडला हिट पार्टी गाण्यांची मेजवानी देणारा हा पंजाब दा पुत्तर सध्या आपल्या टीमसाठी ‘टायटल ट्रॅक’ बनवण्यात व्यस्त आहे.  
अंग्रेजी बीट, हाय हिल्स आणि डोप शोप यांसारख्या गाण्यांतून पुढे आलेल्या रॅपर हनी सिंहनं आपल्या टीमचं हे नवं टायटल ट्रॅक बनवून तयार असल्याचं म्हटंलय. हे गाणंही हीट होईल, यात त्याला शंका वाटत नाहीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.