मुंबई :  रवीचंद्रन अश्विनने पुन्हा एकदा कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत स्थान पटकावलं आहे. आर अश्विन यापूर्वीच अँटिगा कसोटीत भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला. अश्विनने यापूर्वी  २०१५ या वर्षाच्या अखेरीस कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत प्रथम स्थान पटकावलं होतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मात्र अश्विनला कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीतलं अव्वल स्थान गमवावं लागलं होतं.  कारण टीम इंडिया त्यानंतर एकाही कसोटी सामन्यात खेळली नव्हती. त्यामुळं पण विंडीज दौऱ्यातल्या पहिल्याच कसोटीनंतर अश्विनने कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान मिळवलं आहे.


 अश्विनचे अष्टपैलू खेळाडूंच्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान आणखी भक्कम झालं आहे. कारण अश्विनने या कसोटीच्या दुसऱ्या डावात ८३ धावांत ७  विकेट्स पटकावल्या, तसेच त्याआधी भारताच्या डावात अश्विनने ११३  धावांची खेळी देखील केली.