चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहित शर्मा भारताचा व्हाईस कॅप्टन?
१ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये भारत पहिली मॅच पाकिस्तानबरोबर ४ जूनला खेळणार आहे.
मुंबई : १ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये भारत पहिली मॅच पाकिस्तानबरोबर ४ जूनला खेळणार आहे. विराट कोहली भारताचा कॅप्टन असला तरी रोहित शर्माकडे व्हाईस कॅप्टनची जबाबदारी देण्यात आल्याची बातमी डेक्कन क्रोनिकल या वर्तमानपत्रानं दिली आहे.
या स्पर्धेसाठी व्हाईस कॅप्टनची निवड करण्यात आली नसली तरी कोहली दुखापतग्रस्त झाला किंवा काही कारणामुळे कोहलीला मॅच खेळता आली नाही तर रोहितकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिल्याचंही या वृत्तात म्हणलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजच्या चौथ्या टेस्टवेळी कोहली दुखापतग्रस्त झाल्यामुळे अजिंक्य रहाणेला कॅप्टन करण्यात आलं होतं. या मॅचमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सीरिजही खिशात टाकली होती. ऑस्ट्रेलियाचाविरुद्धच्या या सीरिजमध्ये रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे खेळू शकला नव्हता.