सिडनी : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भारताची टेनिसस्टार सानिय मिर्झा आणि चेक रिपब्लिकची तिची जोडीदार बार्बोरा स्ट्रायकोव्हा यांनी विजयी सलामी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलामीच्या लढतीत सानिया-बार्बोरा जोडीसमोर ग्रेट ब्रिटनच्या जोसलिन रे आणि अॅना स्मिथ यांचे आव्हान आहेत. सानिया-बार्बोराने ग्रेट ब्रिटनच्या या जोडीवर ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली. 


पहिल्या सेटमध्ये ग्रेट ब्रिटनच्या जोडीने सानिया-बार्बोराला थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी सरस खेळ करताना पहिला सेट ६-३ असा जिंकला. दुसऱ्टा सेटमध्ये मात्र सानिया-बार्बोरा जोडीने प्रतिस्पर्धी जोडीला डोके वर काढण्याची संधी अजिबात दिली नाही आणि ६-१ असा दुसरा सेट आपल्या नावे करत दुसऱ्या फेरीत मजल मारली.