सानियाच्या बहिणीच्या साखरपुड्याला शोएबची गैरहजेरी!

टेनिस स्टार सानिया मिर्झा हिची बहिण अनम हिचा साखरपुडा १७ नोव्हेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यासाठी सानियाचे अनेक नातेवाईक दाखल झाले होते... पण, यामध्ये सानियाचा पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक मात्र दिसत नव्हता. 

Updated: Sep 19, 2015, 09:16 PM IST
सानियाच्या बहिणीच्या साखरपुड्याला शोएबची गैरहजेरी! title=

हैदराबाद : टेनिस स्टार सानिया मिर्झा हिची बहिण अनम हिचा साखरपुडा १७ नोव्हेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यासाठी सानियाचे अनेक नातेवाईक दाखल झाले होते... पण, यामध्ये सानियाचा पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक मात्र दिसत नव्हता. 


सानिया

या सोहळ्यासाठी उपस्थित राहता आलं नाही यासाठी शोएबनं ट्विटरवरून माफीही मागितीलीय. 'अनम आणि अकबरला साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा... माफ करा मी येऊ शकलो नाही. पण, लग्नात मात्र जरूर उपस्थित राहीन' असं शोएबनं ट्विटरवर म्हटलंय. 

सानियानं आपल्या बहिणीसोबतचा एक फोटोही ट्विटरवर शेअर केलाय... यावेळी, तिनं मनीष मल्होत्रानं डिझाईन केलेला लेहंगा परिधान केला होता. 

सानियाची बहिण अनम हिनं मास कम्युनिकेशन आणि सिनेनिर्मीतीचा कोर्स केलाय. तिचा होणारा पती अकबर रशीद याचा हैदराबादमध्ये बिझनेस आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.