इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात होऊ शकतात हे रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आज भारताची करो वा मरो स्थिती आहे. मालिकेतील आव्हान टिकवून ठेवायचे असल्यास भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. आजच्या या सामन्यात अनेक रेकॉर्डही होऊ शकतात.

Updated: Jan 29, 2017, 12:20 PM IST
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात होऊ शकतात हे रेकॉर्ड title=

नागपूर : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आज भारताची करो वा मरो स्थिती आहे. मालिकेतील आव्हान टिकवून ठेवायचे असल्यास भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. आजच्या या सामन्यात अनेक रेकॉर्डही होऊ शकतात.

१. या सामन्यात धोनीने एकही षटकार ठोकला नाही आणि विराटने ३ षटकार लगावले तर टी-२०मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत विराट धोनीलाही मागे टाकू शकतो.

२. युवराज सिंगने जर या सामन्यात दोन जणांना LBW पद्धतीने बाद केले. तर असे करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरेल.

३. बुमराहने या सामन्यात आणखी एक मेडन ओव्हर टाकल्यास तो हरभजन सिंगशी बरोबरी करू शकतो. 

४. या सामन्यात विराटने ४ चौकार ठोकले तर टी-२०मध्ये सर्वाधिक चौकार लगावणारा तो तिसरा फलंदाज ठरेल.