`पीएफ` खातं होणार ऑनलाईन हस्तांतरीत

भविष्यनिर्वाह निधीचं म्हणजेच पीएफ खात्याचं ऑनलाईन हस्तांतर करण्याची सुविधा पुढील आठवड्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोकरी बदलणाऱ्या सुमारे 13 लाख ‘पीएफ` खातेधारकांना दरवर्षी या सेवेचा फायदा मिळणार असून, त्यामुळं अनेकांचा वेळ वाचणार आहे. ईपीएफओनं ऑनलाईन सेवेची यापूर्वीच यशस्वी चाचणी घेतली आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 19, 2013, 08:57 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
भविष्यनिर्वाह निधीचं म्हणजेच पीएफ खात्याचं ऑनलाईन हस्तांतर करण्याची सुविधा पुढील आठवड्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोकरी बदलणाऱ्या सुमारे 13 लाख ‘पीएफ` खातेधारकांना दरवर्षी या सेवेचा फायदा मिळणार असून, त्यामुळं अनेकांचा वेळ वाचणार आहे. ईपीएफओनं ऑनलाईन सेवेची यापूर्वीच यशस्वी चाचणी घेतली आहे.
ही सेवा सुरू झाल्यानंतर ‘पीएफ` खात्याच्या हस्तांतराची मागणी कंपनीमार्फत ‘ईपीएफओ`कडं ऑनलाईन नोंदविता येणार आहे. या सेवेसाठी ‘ईपीएफओ`नं सेंट्रल क्लिाअरन्स हाऊसची स्थापना केली आहे. या माध्यमातून अवघ्या तीन दिवसांत ‘पीएफ`खातं हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्याचा ‘ईपीएफओ`चा मानस आहे.
काही निवडक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना आजपासून ही ऑनलाईन सेवा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘पीएफ` खातेधारकांच्या डिजिटल स्वाक्षरीची नोंद करण्यास 25 जुलैपासूनच ‘ईपीएफओ`नं सुरुवात केली असून, त्याला माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ‘पीएफ` खातं हस्तांतर करण्याची सर्वाधिक मागणी आयटी कंपन्यांकडून येते. देशभरातील सुमारे 6.9 लाख कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचं व्यवस्थापन ‘ईपीएफओ` करतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.