मुंबई : आकांक्षा हजारी या ३२ वर्षीय युवतीने ६.८ कोटींचं पॅकेज नाकारलं आहे. हॉंगकॉंगमध्ये लहानाची मोठी झालेली आकांक्षाने स्वत:चे स्टार्टअप सुरु केले. भारतातच एक 'अलीबाबा' उभा करायचा निर्धार आकांक्षाने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीबाबा ही चीनची साईट आहे, यावर जगभरात मोठ्या प्रमाणात होलसेल वस्तूंची विक्री होते, याचा मोठा फायदा चीनला आहे. ही साईटवर जगभरातील लोकांना होलसेल मालाची देवाण-घेवाण करता येते, आकांक्षाने आपला निर्धार पूर्ण करण्‍यासाठी अलीबाबा सारखी साईट सुरू केली आहे.


मुंबईत 'एम.पाणी' नावाचं एक स्टार्टअप आकांक्षाने सुरु केले आहे. आकांक्षाने दीड वर्षांपूर्वी सुरू केलेला हा एक लॉयल्टी प्लॅटफॉर्म आहे. यात छोट्या- छोट्या दुकानदार आणि ग्राहकांना जोडले जाते.


जॅक मा यांनीही सुरुवातीच्या टप्प्यात 'अलीबाबा'च्या माध्यमातून बायर्स आणि सेलर्स यांना जोडण्याचे काम सुरु केले होते. तसेच एम.पाणीला 'अलीबाबा'सारखा ग्लोबल प्लॅटफॉर्म बनवण्याचे आकांक्षाचे स्वप्न आहे.