close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बाबा रामदेव यांच्या पतंजली जीन्सची खिल्ली

बाबा रामदेव यांच्या पतंजलीची जीन्स लवकरच बाजारात येणार आहे, त्याआधी या जीन्सची सोशल मीडियावर खिल्ली उडवणे सुरू झाले आहे. पतंजलीची जीन्स येणार असल्याची घोषणा, बाबा रामदेव यांनी केली, या घोषणेनंतर ट्विटरवर मात्र याच बरीच खिल्ली उडवण्यात आली.

Updated: Sep 12, 2016, 04:45 PM IST
बाबा रामदेव यांच्या पतंजली जीन्सची खिल्ली

मुंबई : बाबा रामदेव यांच्या पतंजलीची जीन्स लवकरच बाजारात येणार आहे, त्याआधी या जीन्सची सोशल मीडियावर खिल्ली उडवणे सुरू झाले आहे. पतंजलीची जीन्स येणार असल्याची घोषणा, बाबा रामदेव यांनी केली, या घोषणेनंतर ट्विटरवर मात्र याच बरीच खिल्ली उडवण्यात आली.

अनेकांनी रामदेव यांचे काही जुने फोटो शोधून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. या वर्षाच्या शेवटी पतंजली 'स्वदेशी जीन्स' लाँच करणार आहे. दरम्यान, भारतातच नव्हे तर आपण भारताबाहेर हा व्यवसाय नेण्याचा विचार करीत आहोत असं त्यांनी सांगितलंय.