होंडाची आलिशान मोबिलियो कार भारतात लाँच

जपानची कार निर्मिती करणारी होंडा कंपनीने भारतात मोबिलियो ही नवी कार लाँच केली आहे.

Updated: Jul 24, 2014, 04:43 PM IST
होंडाची आलिशान मोबिलियो कार भारतात लाँच  title=

नवी दिल्ली : जपानची कार निर्मिती करणारी होंडा कंपनीने भारतात मोबिलियो ही नवी कार लाँच केली आहे.

होंडा कंपनीने एमपीव्ही (मल्टी परपस व्हीकल) मोबिलियो या कारची सुरुवातीला 6.49 लाख रुपये किंमत ठेवली आहे. ही कार  डिझेल आणि पेट्रोलवर असणार आहे. डिझेल मॉडेलची किंमत 7.89 लाख आहे. कंपनीने लाँच केलेल्या कारची किंमत ही दिल्लीसाठी आहे.

होंडा कार्स् इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ हिरोनोरी कानायामा यांनी सांगितले की, होंडाच्या अमेज आणि सिटी या दोन कारच्या यशस्वीतेनंतर ही कार बाजारात आणली आहे. या दोन कारमुळे गेल्या आर्थिक वर्षात 83 टक्के विक्री वाढली आहे. मोबिलियो कारला चांगले मार्केट मिळेल, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आलाय.

एमपीव्ही होंडाच्या बॅंकॉक स्तित आरअॅंडडी सुविधा प्रमाणे विकसित केली गेली आहे. ही कार खास करुन भारत आणि इंडोनेशिया बाजारात उतविण्यात आली आहे. होंडाच्या या कारची किंमत मारुतीच्या एर्टिगा या कारपेक्षा जास्त आहे. या कारची किंमत 5.8 लाख रुपये दिल्लीत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.