मुंबई : तुम्हीही जर ऑनलाईन वेबसाईटवरुन स्मार्टफोन खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अॅमेझॉन या ऑनलाईन वेबसाईटने त्यांच्या ऱिफंड पॉलिसींच्या नियमात बदल केलेत. सात फेब्रुवारीपासून हे नवे नियम लागू करण्यात आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही एखादा स्मार्टफोन खरेदी केला आणि तो जर तुम्हाला पसंत नाही पडला तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही. आता केवळ खराब झालेले अथवा तुटलेले फोन अॅमेझॉनवर परत घेतले जातील. तुम्ही फोन एक्सचेंज करु शकता मात्र पैसे परत मिळणार नाहीत. 


तसेच फोन खराब असल्यास डिलीवरीच्या १० दिवसांच्या आत बदलून दिला जाईल त्यानंतर नाही. ज्या वस्तूंवर रिटर्न पॉलिसी लागू करण्यात आलेली नाही त्याचा वेबसाईटवर उल्लेख करण्यात आलाय. 


स्नॅपडीलचीही पॉलिसीही साधारण अॅमेझॉनसारखीच आहे. येथेही वस्तू पसंद न पडल्यास तुम्ही रिटर्न करु शकत नाही म्हणजेच तुम्हाला रिफंड मिळणार नाही.