मुंबई : गुगल क्रोम किंवा मोझिला यांसारख्या ब्राऊजरवर इंटरनेट सुरू असताना अनेक जाहिरातींचा मारा तुमच्यावर होत असतो. हाच त्रास कमी करायचा असेल तर तुमच्याकडे आता 'सॅमसंग'च्या एका नव्या ब्राऊजरचा पर्याय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसंगचा ब्राऊजर अॅप आता गुगल प्ले स्टोअरवरही उपलब्ध आहे. तुमच्या फोनवर किंवा डेस्कटॉपवर जाहिराती ब्लॉक करण्यासाठी हा ब्राऊजर तुम्हाला मदत करतो.


सॅमसंग इंटरनेट ४.० याअगोदर, ज्यामध्ये मार्शमॅलो किंवा त्यानंतरच्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणाऱ्या डिव्हाईसवर काम करू शकत होतं. परंतु, आता मात्र कोणत्याही सॅमसंग गॅलक्सी डिव्हाईसवर हा ब्राऊजर डाऊनलोड केला जाऊ शकतो. 


तुमच्या ब्राऊजिंगची 'हिस्ट्री' हा ब्राऊजर ऑनलाईन कंपन्यांच्या नजरेपासून वाचवून ठेवतो. शिवाय, सॅमसंगच्या आपल्या सिक्युरिटी नॉक्सचाही तुम्हाला फायदा मिळतो. 


सध्या हा ब्राऊजर केवळ सॅमसंग डिव्हाईसवरच काम करेल कारण यासाठी फिंगर प्रिंट सिक्युरिटीची आवश्यकता आहे. 


गुगलसाठी आव्हान...


गुगलसाठी मात्र हे आव्हान आहे. कारण ऑनलाईन जाहिराती आणि सर्च मुळेच तर गुगल कोट्यवधींची कमाई करतं. आता गुगल या नव्या आव्हानाला कसं सामोरं जातं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.