मुंबई : रिलायन्स जिओने सुरु केलेल्या फ्री व्हॉईस कॉलिंग तसचे डेटा ऑफरमुळे अनेकांनी हे सिमकार्ड घेतलंय. मात्र त्यातील बऱ्याच जणांना काही समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकदा फोनमध्ये सिम घातल्यानंतरही नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. तर काहींना स्लिम स्लॉटचा प्रॉब्लेम. जिओ कार्डशी संबंधित या तीन समस्या तुम्ही चुटकीसरशी दूर करु शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिम स्लॉट प्रॉब्लेम - स्मार्टफोनमध्ये जिओचे सिमकार्ड टाकल्यानंतर पहिली समस्या येते ती स्लिम स्लॉटची. ड्युअल सिम यूजर्सला ही समस्या अधिक सतावते. जिओचे सिम तुम्हाला पहिल्या स्लॉटमध्ये टाकायचे आहे. यातच जर तुमच्या ड्युअल फोनमध्ये एक स्लॉट मायक्रो आणि दुसरा मिनी आहे तर पहिल्या सिमला दुसऱ्या स्लॉटमध्ये टाकण्यास त्रास होतो. यावेळी सिम अॅडॉप्टर वापरा. अॅडॉप्टरच्या मदतीने सिम योग्य त-हेने काम करत नसेल तर सिम बदलावे लागेल.


नेटवर्क प्रॉब्लेम - जिओ यूजर्सना सर्वाधिक त्रास होतो तो नेटवर्कचा. सिम टाकूनही नेटवर्क येत नसेल तर Settings > Mobile Networks > Preferred Network Type > LTE सिलेक्ट करावे. जर तुमचा फोन ड्युएल सिम असेल तर पहिला स्लॉट ४जीला सपोर्ट करणारा नसेल. अशावेळी जिओ सिम पहिल्या स्लॉटमध्ये टाका.


सेटिंग प्रॉब्लेम - ड्युअल सिम स्मार्टफोनमध्ये सिम स्लॉट केल्यानंतर संपूर्ण सेंटिग बदलते. याचाच अर्थ तुमच्या फोनच्या पहिल्या स्लॉटमध्ये दुसरे सिम असेल आणि त्याच स्लॉटमध्ये तुम्ही जिओ सिम टाकल्यास स्मार्टफोनची सेंटिगही बदलते. यामुळे इंटरनेट तसेच कॉलिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे सिमकार्ड सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला कनेक्टिविटी, कॉल्स, मेसेज आणि डेटाच्या सेटिंग्स बदलाव्या लागतील.