VIDEO : पैसे-नोकरी पाहून 'पती' निवडणाऱ्या मुलींना जोरदार चपराक

चांगली नोकरी नाही, जवळ पैसे नाहीत, मोठ्ठं घर नाही म्हणून मुलांना नकार देणाऱ्या मुलींना प्रत्यूत्तर देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Updated: Jun 25, 2016, 04:32 PM IST
VIDEO : पैसे-नोकरी पाहून 'पती' निवडणाऱ्या मुलींना जोरदार चपराक title=

मुंबई : चांगली नोकरी नाही, जवळ पैसे नाहीत, मोठ्ठं घर नाही म्हणून मुलांना नकार देणाऱ्या मुलींना प्रत्यूत्तर देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

मुलींना बऱ्याचदा गोरं असणाऱ्यावर आणि सुंदर दिसण्यावर जज केलं जातं... तितकंच हेही खरं आहे की मुलांना अनेकदा पैशांवर आणि त्यांच्या मिळकतीवर जज केलं जातं.

'तू किती कमावतोस? किंवा तुझं सॅलरी पॅकेज किती?' असा प्रश्न एखाद्या मुलाला विचारला गेला नसेल तरच नवल... आणि जर अपेक्षेप्रमाणे नसेल तर अशा मुलांना लगेचच डिच्चू मिळतो... अशाच काही मुलींसाठी आणि असा अनुभव आलेल्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे...