सेना-काँग्रेस 'मैत्रीत', भाजप सापडलं 'कात्रीत'?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं या दोन पक्षांतल्या मैत्रीचा आणखी एक अध्याय लिहिला गेला आहे.... पाच वर्षांपूर्वी एनडीएच्या उमेदवाराविरोधात जाऊन शिवसेनेनं काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटलांना पाठिंबा दिला होता.

Updated: Jun 19, 2012, 03:49 PM IST

www.24taas.com, चंद्रपूर

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं या दोन पक्षांतल्या मैत्रीचा आणखी एक अध्याय लिहिला गेला आहे.... पाच वर्षांपूर्वी एनडीएच्या उमेदवाराविरोधात जाऊन शिवसेनेनं काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटलांना पाठिंबा दिला होता..... आता पाच वर्षांनी त्याचीच पुनरावृत्ती झाली..... दोन्ही पक्ष ठाणे महापालिकेपासून ते थेट राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत एकत्र आलेत.....

 

मित्रपक्षांनी दगाफटका केल्यानं बदला घेण्यासाठीच दोन्ही पक्ष ठिकठिकाणी एकमेकांना साथ देताना दिसतात..... राष्ट्रवादीनं जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत काँग्रेसला दगा दिला म्हणून काँग्रेसनं शिवसेनेला ठाण्यात साथ दिली.... तर नाशिकमध्ये भाजपनं मनसेला साथ दिल्यानं महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसला साथ दिली.....

 

भाजप-सेनेतल्या वाढत्या तणावामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरात शिवसेनेनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ दिली..... तर भाजपकडून शिवसेनेचं खच्चीकरण होत असल्यानं राष्ट्रपती निवडणुकीची संधी साधून शिवसेनेनं काँग्रेसला साथ देऊन भाजपला धडा शिकवल्याचं मानलं जातं.....